Thursday, January 11, 2018

महाजालाचे मुक्तायन - - एक संवाद ब्लॉगच्या माध्यमातून

महाजालाचे मुक्तायन ही लेखमाला ओपन सोर्स या सॉफ्टवेअर क्षेत्रामध्ये सुरु झालेल्या पण आज अन्य अनेक क्षेत्रांमध्ये पसरलेल्या व्यवस्थेचा उहापोह करणारी आहे. लोकसत्ता या मराठी भाषेतील अग्रेसर आणि पुरोगामी विचारांच्या दैनिकामध्ये ही लेखमाला दर सोमवारी त्याच्या "विचार" या पानावर प्रकाशित होणार आहे. 

ओपन सोर्स ही डिजिटल युगातली एक चळवळ आहे. ज्ञान (Knowledge) ही एक सार्वजनिक ठेव (public good) आहे व म्हणूनच काही मूठभर लोक वा संस्था, बौद्धिक संपदा व कॉपीराईटच्या नियमांचा वापर करून ज्ञान निर्मिती आणि प्रसारावर बंधनं लादू शकत नाहीत, या तत्वज्ञानाचा ओपन सोर्स चळवळ हिरीरीने पुरस्कार करते. व्यक्तीला अथवा समाजाला असलेल्या वैचारिक स्वातंत्र्याला तिचा पूर्ण पाठिंबा आहे. खरं सांगायचं तर या विषयावर लिहिण्यासारखं पुष्कळ आहे आणि वृत्तपत्रातल्या शब्दमर्यादेत या विषयाला १००% न्याय देणे काहीसे अवघड आहे.

त्याचसाठी मी हा ब्लॉग सुरु करत आहे. जस जसे माझे लेख लोकसत्तामध्ये प्रकाशित होत जातील त्यांची एक प्रत मी या ब्लॉग वर सुद्धा (लोकसत्ता इ-पेपर च्या माध्यमातून) प्रसिद्ध करेन. यामुळे कोणास मागील लेख वाचायचे असतील तर एकाच ठिकाणी त्यांच्या सर्व लिंक्स उपलब्ध होतील.

त्याही पुढे जाऊन (जो या ब्लॉगचा मूळ उद्देश आहे) मी या ब्लॉगवर वेळोवेळी काही पूरक दस्तावेज किंवा लिंक्स प्रसिद्ध करेन ज्या माझ्या लेखांशी निगडित असतील पण शब्दमर्यादेमुळे वर्तमानपत्रातील लेखांमध्ये समाविष्ट होऊ शकल्या नसतील. त्याचबरोबर तुमचे अभिप्राय या ब्लॉगद्वारेसुद्धा तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचवू शकता, ज्याने माझ्या ज्ञानात भर पडेल व लेखांमध्ये सुधारणाही करता येतील.

या ब्लॉगमुळे आपल्यामध्ये सुदृढ वैचारिक देवाणघेवाण होऊन माझ्यासकट आपल्या सर्वांची ज्ञानजिज्ञासा वाढीस लागेल याची मला खात्री वाटते. 

5 comments:

  1. खूप छान ब्लॉग आहे ! खूपच माहितीपूर्ण !

    ReplyDelete
    Replies
    1. अभिप्रायाबद्दल धन्यवाद !!

      Delete
  2. Thank you Sir i like a blog very much Also thanks for giving a such information in marathi this information also important for putting us to up to date with day by day change of IT sector which is related to our daily life.thanks again
    Vishnu

    ReplyDelete
  3. Thanks a lot. I really enjoyed the some portion of the series of articles. I haven't finished reading them all but I found the content very useful. Thanks a lot for your effort.

    ReplyDelete