Monday, January 29, 2018

महाजालाचे मुक्तायन - लेखांशी संलग्न आणि पूरक माहिती (१)

या लेखमालिकेतल्या दुसऱ्या सदरात २ पुस्तकांचा उल्लेख केला आहे. दोनही पुस्तके अतिशय सुरेख आहेत आणि नशिबाने इंटरनेट वर वाचण्यासाठी उपलब्ध आहेत, ज्याच्या लिंक्स खाली देत आहे. जिज्ञासूंनी ही पुस्तके जरूर वाचावीत.

पुस्तक १: In the beginning...was the command line
लेखक: नील स्टिफन्सन
संकेतस्थळ: Click to download

पुस्तक १: The mythical man month
लेखक: फ्रेडरिक ब्रुक्स 
संकेतस्थळ: Click to download

महाजालाचे मुक्तायन - सदर ५ (सॉफ्टवेअरची एक मुक्त संकल्पना)

लोकसत्ता २९ जानेवारी २०१८ -

लोकसत्ता इ-पेपर: सॉफ्टवेअरची एक मुक्त संकल्पना

loksatta.com: सॉफ्टवेअरची एक मुक्त संकल्पना

Thursday, January 11, 2018

महाजालाचे मुक्तायन - सदर २ (सॉफ्टवेअरचा संक्षिप्त इतिहास - भाग १)

लोकसत्ता ८ जानेवारी २०१८ -

लोकसत्ता इ-पेपर: सॉफ्टवेअरचा संक्षिप्त इतिहास - भाग १

loksatta.com: सॉफ्टवेअरचा संक्षिप्त इतिहास - भाग १

महाजालाचे मुक्तायन - सदर १ (डिजिटल युगातील एक चळवळ आणि क्रांती)

लोकसत्ता १ जानेवारी २०१८ -  डिजिटल युगातील एक चळवळ आणि क्रांती 

महाजालाचे मुक्तायन - - एक संवाद ब्लॉगच्या माध्यमातून

महाजालाचे मुक्तायन ही लेखमाला ओपन सोर्स या सॉफ्टवेअर क्षेत्रामध्ये सुरु झालेल्या पण आज अन्य अनेक क्षेत्रांमध्ये पसरलेल्या व्यवस्थेचा उहापोह करणारी आहे. लोकसत्ता या मराठी भाषेतील अग्रेसर आणि पुरोगामी विचारांच्या दैनिकामध्ये ही लेखमाला दर सोमवारी त्याच्या "विचार" या पानावर प्रकाशित होणार आहे. 

ओपन सोर्स ही डिजिटल युगातली एक चळवळ आहे. ज्ञान (Knowledge) ही एक सार्वजनिक ठेव (public good) आहे व म्हणूनच काही मूठभर लोक वा संस्था, बौद्धिक संपदा व कॉपीराईटच्या नियमांचा वापर करून ज्ञान निर्मिती आणि प्रसारावर बंधनं लादू शकत नाहीत, या तत्वज्ञानाचा ओपन सोर्स चळवळ हिरीरीने पुरस्कार करते. व्यक्तीला अथवा समाजाला असलेल्या वैचारिक स्वातंत्र्याला तिचा पूर्ण पाठिंबा आहे. खरं सांगायचं तर या विषयावर लिहिण्यासारखं पुष्कळ आहे आणि वृत्तपत्रातल्या शब्दमर्यादेत या विषयाला १००% न्याय देणे काहीसे अवघड आहे.

त्याचसाठी मी हा ब्लॉग सुरु करत आहे. जस जसे माझे लेख लोकसत्तामध्ये प्रकाशित होत जातील त्यांची एक प्रत मी या ब्लॉग वर सुद्धा (लोकसत्ता इ-पेपर च्या माध्यमातून) प्रसिद्ध करेन. यामुळे कोणास मागील लेख वाचायचे असतील तर एकाच ठिकाणी त्यांच्या सर्व लिंक्स उपलब्ध होतील.

त्याही पुढे जाऊन (जो या ब्लॉगचा मूळ उद्देश आहे) मी या ब्लॉगवर वेळोवेळी काही पूरक दस्तावेज किंवा लिंक्स प्रसिद्ध करेन ज्या माझ्या लेखांशी निगडित असतील पण शब्दमर्यादेमुळे वर्तमानपत्रातील लेखांमध्ये समाविष्ट होऊ शकल्या नसतील. त्याचबरोबर तुमचे अभिप्राय या ब्लॉगद्वारेसुद्धा तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचवू शकता, ज्याने माझ्या ज्ञानात भर पडेल व लेखांमध्ये सुधारणाही करता येतील.

या ब्लॉगमुळे आपल्यामध्ये सुदृढ वैचारिक देवाणघेवाण होऊन माझ्यासकट आपल्या सर्वांची ज्ञानजिज्ञासा वाढीस लागेल याची मला खात्री वाटते.